हर्षवर्धन जाधव यांची ऑस्टीन मारटीन या विदेशी कंपनीमध्ये अभियंता म्हणून निवड.
schedule05 Jul 24 person by visibility 643 categoryसामाजिक
हर्षवर्धन जाधव यांची ऑस्टीन मारटीन या विदेशी कंपनीमध्ये अभियंता म्हणून निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे :कासारवाडा पाटणकर (ता.राधानगरी )येथील हर्षवर्धन धनंजय जाधव यांची इंग्लंड येथील ऑस्टीन मारटीन या १११ वर्षे जुन्या असलेल्या रेसिंग कार बनवण्याच्या कंपनीमध्ये हाँटलाईन इंजिनियर म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे.
हर्षवर्धन जाधव यांनी गतवर्षी इंग्लंड येथील लिस्टन युनिव्हर्सिटी मधून मास्टर ऑफ ऍडव्हान्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर या कंपनीमध्ये नियुक्ती झाली आहे .त्यांना भारतीय चलनानुसार वार्षिक ४१ लाख रुपये वेतन मिळणार आहे.
श्री .जाधव यांनी ४ थी चंदगड मध्ये चौथीच्या स्काँलरशिप मध्ये ३०० पैकी २९८ गुण प्राप्त केले होते . त्याला शिक्षक बाबुराव परीट यांचे सहकार्य मिळाले. त्यानंतर त्याने संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनियर ही पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथे मास्टर इन मेकॅनिक इंजिनियर कोर्स पूर्ण करण्यासाठी महालक्ष्मी अकॅडमी येथील प्रा. अभय केळकर यांचे सहकार्य लाभले .हर्षवर्धन हा राजकुवर जाधव (सरकार) व कृषी विभागाचे लेखाधिकारी धनंजय जाधव यांचे चिरंजीव आहेत.
....।
फोटो
हर्षवर्धन जाधव